चेहऱ्यातील साम्यामुळे पर्रिकरांची ओळख मला मिळाली हे माझं भाग्य: योगेश सोमण

महत्त्वाचं म्हणजे पर्रिकरांसारखं चेह-यात साम्य असणारे अभिनेते योगेश सोमण यांनी ट्विटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या आजाराने रविवारी 17 मार्च रोजी निधन झालं. एक सच्चा आणि सुसंस्कृत नेता हरपला अशी हळहळ सर्वच स्तरातून व्यक्त झाली. सर्वसामान्यात मिसळणारा असामान्य नेता हरपला आणि गोव्याने आपला सुपूत्र हरवला अशा भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. महत्त्वाचं म्हणजे पर्रिकरांसारखं चेह-यात साम्य असणारे अभिनेते योगेश सोमण यांनी ट्विटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

योगेश सोमण यांनी ‘उरी’ सिनेमात पर्रिकरांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे चित्रपटासाठी का होईना पर्रिकरांचं आयुष्य त्यांनी काही काळासाठी जगलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पर्रिकरांचं आयुष्य काही काळासाठी जगायला मिळालं हे भाग्य असल्याचं योगेश सोमण यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of