या रविवारी झी युवावर आहे महारविवार, पाहा तुमच्या आवडत्या मालिकांचे विशेष भाग

रविवार हा दिवस सर्वसामान्य व्यक्तीसाठी खास असतो. अनेकदा मालिकाविश्वातही हा दिवस अत्यंत खास ठरतो. मालिकांमध्ये काही महत्त्वाचे बदल, वेगळं वळण येणार असेल तर रविवार हा दिवसच मस्ट असतो.

रविवार हा दिवस सर्वसामान्य व्यक्तीसाठी खास असतो. अनेकदा मालिकाविश्वातही हा दिवस अत्यंत खास ठरतो. मालिकांमध्ये काही महत्त्वाचे बदल, वेगळं वळण येणार असेल तर रविवार हा दिवसच मस्ट असतो. या रविवारी झी युवानेही आपल्या महत्त्वाच्या मालिकांमधील वेगळं वळण प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं आहे. आतापर्यंत लोकप्रिय ठरलेल्या झीच्या ‘तु अशी जवळी रहा’, ‘फुलपाखरु’ आणि ‘वर्तुळ’ या मालिकांचे विशेष भाग रसिकांच्या भेटीला येत आहे.

तु अशी जवळी रहा या मालिकेत आज मनवाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. कारण आज मनवाचा परफॉर्मन्स आहे. राजवीरच्या अतिरेकी प्रेमाच्या सावलीत मनवामधील कलाकार अजूनही हरलेली नाही. त्यामुळे आजचा परफॉर्मन्सचा दिवस मनवासाठी खुप खास असणार आहे.

त्यानंतरची सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे फुलपाखरु. मानस वैदेहीची जोडी रसिकांच्या जीवनाचा भाग बनली आहे. मानस वैदेहीच्या जीवनात एक सुंदर बदल झाला आहे तो बाळाच्या रुपाने. हे दोघंही एका गोड मुलीचे आई बाबा बनले आहेत. पण शाल्मलीच्या मातृत्वाची ओढ पाहून वैदेही आपलं बाळ देईल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पहावा लागेल.

लग्नघरी कार्यक्रमांची रेलचेल असते. असंच काहीसं घडत आहे वर्तुळ मालिकेतील अभि आणि मीनाक्षीच्याबाबतीत. प्रेक्षकांनाही या निमित्ताने लग्नघरातील गडबड अनुभवता येणार आहे. या मालिकांचा आनंद घेण्यासाठी सात वाजता झी युवा अवश्य पहा.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of