Exclusive:अक्षय कुमारचा डिजीटल डेब्यू;जबरदस्त अ‍ॅक्शनने जिंकणार प्रेक्षकांचं मन

'सूर्यवंशी'तील अक्षय कुमारचा अ‍ॅक्शनपॅक दमदार लूक पाहून सिनेमाबाबतची उत्कंठा आणखी वाढली असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे,

बॉलिवूडमध्ये स्टंट एक्सपर्ट आणि स्वत:चे स्टंट स्वत: करण्यासाठी प्रसिध्द असलेला एकमेव अभिनेता म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या बहुचर्चित सिनेमात अभिनेता अक्षय कुमार सुपरकॉप साकारतोय हे आपण सर्वच जाणतो. या सिनेमाचा बहुप्रतिक्षीत फर्स्ट लूक आज 5 मार्च रोजी सोशल मिडीयावर उलगडला. सर्वांनाच अक्षयचा हा

अ‍ॅक्शनपॅक दमदार लूक पाहून सिनेमाबाबतची उत्कंठा आणखी वाढली असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार लवकरच आपला डिजीटल डेब्यू करतोय.अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सिरीजमध्ये अक्षय कुमार झळकणार आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईमकडून अक्षय कुमारची सिरीज हे चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज असणार आहे. आज महालक्ष्मी रेसकोर्सच्या टर्फ क्लबवर प्रसिध्दी माध्यमांसमोर या सिरीजची मोठी घोषणा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेझॉनचं असं करण्यामागे मोठं कारण आहे. अक्षयची या कार्यक्रमादरम्यान दमदार एन्ट्री होणार असून तो प्रसिध्दी माध्यमांसमोर मोठा स्टंट करणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of