Exclusive: बॉलिवूडमध्ये बनत आहे नवीन चौकडी, तुम्ही ओळखलं का कोण आहे यात

बॉलिवूडमध्ये कोण कधी कुणाचा मित्र होईल किंवा शत्रू होईल सांगता येत नाही. अनेकदा कालपर्यंत असलेल्या अनोळखी कलाकारांमध्ये एका क्षणात मैत्री होते.

बॉलिवूडमध्ये कोण कधी कुणाचा मित्र होईल किंवा शत्रू होईल सांगता येत नाही. अनेकदा कालपर्यंत असलेल्या अनोळखी कलाकारांमध्ये एका क्षणात मैत्री होते. अनेकदा अनेक वर्ष एकत्र असलेली नाती एका क्षणात दुरावतात.
बी टाऊनमध्ये मात्र सध्या तरी एका ग्रुपची चर्चा जोरात आहे. या चौकडीमध्ये समाविष्ट आहेत दीपिका, रणवीर, आलिया आणि रणबीर. दीपिका आणि रणबीरच्या मैत्रीबद्दल सगळ्यांना माहीत आहेच पण या दोघांचे पार्टनरदेखील या ग्रुपमध्ये सामील झालेत.

हे चौघंही एका अवॉर्ड सोहळ्यात एकत्र बसले होते. त्यावेळी त्यांचे फोटो हा चर्चेचा विषय बनले आहेत. या चौघांना एकत्र युएस डान्स टूरची ऑफर आल्याचं देखील बोललं जात होतं. आलियाला याबद्दल छेडलं असता तिने खुलासा केला. ती म्हणते, ‘आम्हाला चौघांच्या एकत्र असण्याची चर्चा होते हे छान वाटतं.’ तिने यावेळी युएस टूरच्या ऑफरचा इन्कार केला. पण अशी चर्चा सुरु होती हे मान्य केलं.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of