Exclusive: शाहरुख बनला वेबसिरीजचा निर्माता, करणार या वेबसिरीजची निर्मीती

अलीकडेच अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक वेबसिरीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. या यादीत आता शाहरुख खानचं नावही समाविष्ट झालं आहे.

अलीकडेच अनेक प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक वेबसिरीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. या यादीत आता शाहरुख खानचं नावही समाविष्ट झालं आहे. शाहरुखची रेडचिली एंटरटेनमेंट नेटफ्लिक्ससाठी एक वेबसिरीज बनवत आहे. बिलाल सिद्दीकी यांची कादंबरी ‘बार्ड ऑफ ब्लड’वर ही सिरीज बेतली असेल. यात इअरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. या सिरीजनंतर रेड चिलीज आणखी एक वेबसिरीज बनवणार आहे.

पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अभिनीत ही सिरीज हुसैन जैदी यांचं अप्रकाशित पुस्तक ‘क्लास ऑफ ८३’ वर आधारलेली असेल. यामध्ये एक आयपीएस ऑफिसरची गोष्ट असेल जो काही नवीन अधिका-यांना प्रशिक्षण देत असतो जे पुढे जाऊन एन्काउंटर स्पेशालिस्ट बनतात. क्राईम टेलिव्हिजन सिरीज पाऊडरचं दिग्दर्शन केलेले अतुल सभरवाल हा वेबसिरीजचे दिग्दर्शक आहेत.

या वेबसिरीजचं शुटिंग लेह आणि राजस्थानमध्ये होणार आहे. याशिवाय अनेक बिग बजेट वेबसिरीज रेडचिलीच्या ताफ्यात आहेत. ऑपरेशन खुखरीवरही एक वेबसिरीज बनवली जाणार आहे. वेबसिरीजबद्द्ल शाहरुख म्हणतो की, वेबसिरीज हा प्लॅटफॉर्म लंबी रेसचा घोडा आहे. या माध्यमातून यंग टॅलेंट मोठ्या प्रमाणावर समोर आलं आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of