Exclusive : संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान शाहरूख एकत्र नाही

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि शाहरूख या सिनेमात एकत्र येणार नाहीत. विशेष म्हणजे हा सिनेमा ‘बैजू बावरा’ या सिनेमाचा रिमेक असेल असं ही बोललं जात होतं. पण या चर्चेवरही पडदा पडला आहे.
आता भन्साळी यांच्या आगामी सिनेमामध्ये फक्त सलमानच दिसेल असं सांगितलं जात आहे. याशिवाय हा सिनेमा कोणात्याही जुन्या सिनेमाचा रिमेक नसणार आहे. हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता करण अर्जुनला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षाकांना आणखी वाट पहावी लागेल यात शंका नाही. या सिनेमासाठी भन्साळी अभिनेत्रीच्या शोधात असून सप्टेंबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होईल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of