Exclusive: शाहरुख कतरिनाची जोडी नाही दिसणार फराह-रोहीतच्या आगामी सिनेमात

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाची. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन फराह खान करत आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाची. रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन फराह खान करत आहे. त्यामुळेच निर्मितीपुर्वीच या सिनेमाला खास असं वलय लाभलं आहे. आता या सिनेमात कोणती जोडी रसिकांसमोर येणार याची उत्सुकताही रसिकांना लागून राहिली आहे.

या सिनेमात शाहरुख-कतरिना लीड रोलमध्ये असतील असं बोललं जात होतं. तसेच हा सिनेमा ७०च्या दशकातील सुपरहिट सिनेमा ‘सत्ते पे सत्त’चा रिमेक असल्याचंही बोललं जात होतं. पण पीपंगमूनने या सगळ्या अफवांवरचा पडदा उठवला आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार शाहरुख-कतरिना ही फराहची लाडकी जोडी या सिनेमात एकत्र दिसणार नाही. या जोडीने यापुर्वी ‘जब तक है जान’ आणि ‘झिरो’मध्ये काम केलं होतं. पण आता फराहच्या सिनेमात एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of