Exclusive: ‘शुभमंगल सावधान’ चा पुढील भाग समलिंगी संबंधावर आधारीत

२०१७ साली प्रदर्शित झालेला शुभमंगल सावधान या चित्रपटाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती.

२०१७ साली प्रदर्शित झालेला ‘शुभमंगल सावधान या चित्रपटाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मनं जिंकली. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता  आनंद एल राय हे या सिनेमाच्या सिक्वलवर काम करत असून आयुष्यमान खुराणा हाच सिक्वलमध्येच प्रमुख भूमिका साकारतोय.  पण ह्यात भूमी पेडणेकर मात्र झळकणार नाही.

पहिल्या भागात लैंगिक समस्येवर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरा भाग हा समलिंगी संबंधावर आधारित असून वडील आपल्या समलिंगी संबंध असण्याऱ्या मुलाला स्वीकारतात का, अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ असं या सिक्वलचं नाव आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून  आणि ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवणारा व्दिवेन्दु शर्मा हा अभिनेता या  सीक्वेलमध्ये काम करणार आहे. पहिल्या भागाचं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्न यांनी केल होत. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन हितेश कैवल्य करत असून  पहिल्या भागाप्रमाणे विनोद आणि कथा यांची योग्य सांगड घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

आर.एस.प्रसन्न हे सिद्धार्थ रॉय कपूर सोबत दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांना या चित्रपटासाठी वेळ देता येत नव्हता. त्यामुळे निर्माते आनंद एल राय यांनी नवीन दिग्दर्शकासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. हितेश यांनी पहिल्या भागाचे  सुद्धा पटकथालेखन केले असल्याने सीक्वेलसाठी दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड योग्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता व्दिवेन्दु शर्मा आयुष्यमानच्या समलिंगी मित्राची भूमिका साकारत आहे. आपली इतर काम संपवून आयुष्यमान खुराणा लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट यंदा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of