Exclusive: हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर 30’मध्ये दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला?

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ मागचं बॅडलक काही संपता संपेना असं दिसत आहे. आता सिनेमात दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला दिल्यावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ मागचं बॅडलक काही संपता संपेना असं दिसत आहे. आता सिनेमात दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला दिल्यावरुन वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीपिंगमूनला विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रोमोमध्ये दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला दिलं आहे. विकासवर ‘मीटू’ अंतर्गत नयनी दीक्षित या अभिनेत्रीने शोषणाची तक्रार नोंदवली होती.

यावर अनेकांचं असं मत आहे की ‘ही चळवळ आता मागे पडली आहे. या अंतर्गत आरोप असलेले अनेकजण राजरोसपणे वावरत आहेत. अशा वेळी एकट्या विकासला शिक्षा देणं योग्य नाही. सिनेमाचा प्रोमो उत्तम आहे. हा सिनेमा सर्वोत्कृष्ट आहे आणि याचं सगळं श्रेय विकासला जातं. म्हणून त्याला श्रेय देणं गरजेचं आहे.’ या आरोपामुळे विकासला सिनेमापासून दूर करण्यात आलं होतं. या सिनेमाच्या लास्ट शेड्युलचं दिग्दर्शन अनुराग बासूने केलं होतं. पण अनुरागने क्रेडिट घेण्यास नकार दिला. ‘सुपर 30’ हा सिनेमा प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्यावर बेतला आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of