Exclusive : मुदस्सर अझीजच्या ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यन दिसणार का?

अनेक गाजलेल्या सिनेमांच्या रिमेकनी बॉलिवूडला यशस्वी सिनेमे दिले आहेत. या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. १९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या सिनेमाचा रिमेक बनवला जाणार असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये जुन्या सिनेमांचा रिमेक बनवणं ही नवीन बाब नाही. अनेक गाजलेल्या सिनेमांच्या रिमेकनी बॉलिवूडला यशस्वी सिनेमे दिले आहेत. या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. १९७८मध्ये आलेल्या ‘पती, पत्नी और वो’ या सिनेमाचा रिमेक बनवला जाणार असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.

‘हॅपी भाग जायेगी’ फेम दिग्दर्शक मुदस्सर अझीज हा रिमेक बनवणार असल्याचं समोर आलं आहे. निर्माते जुनो चोप्रा आणि अभय चोप्रा हे टी- सिरीजचे भूषण कुमार यांच्यासह या रिमेकची निर्मिती करत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडचं यंग सेंसेशन कार्तिक आर्यन या रिमेकमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ मधून प्रकाशझोतात आलेल्या कार्तिक सध्या इम्तियाज अलीच्या एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केलं होतं. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिमेकमधील कथेची मांडणीही याच अंगाने जाणारी असल्याचं दिग्दर्शक मुदस्सर अझीम यांनी सांगितलं. या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं. या सिनेमातील इतर कलाकारांची नावंही लवकरच जाहीर केली जातील असंही ते म्हणाले.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of