फरहान अख्तरने ‘लेडीलव्ह’ शिबानी दांडेकरसाठी लिहिला हा खास संदेश

फरहान अख्तर सध्या चर्चेत आहे ते शिबानी दांडेकरसोबत असलेल्या अफेअरमुळे. दोघांनीही आपलं नातं सोशल मिडियापासून लपवलेलं नाही. त्यांच्या सोशल मिडियातील एकत्र अ‍ॅपिअरन्स आता नेटक-यांनीही स्विकारला आहे.

फरहान अख्तर सध्या चर्चेत आहे ते शिबानी दांडेकरसोबत असलेल्या अफेअरमुळे. दोघांनीही आपलं नातं सोशल मिडियापासून लपवलेलं नाही. त्यांच्या सोशल मिडियातील एकत्र अ‍ॅपिअरन्स आता नेटक-यांनीही स्विकारला आहे. फरहानने अलीकडेच सोशल मिडियावर एका पोस्ट अपडेट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने शिबानीसाठी एका भावनिक संदेश लिहिला आहे. या पोस्टमध्ये फरहान म्हणतो, तुम मुस्कुराओ जरा, चिराग जला दो जरा, अंधेरा हटा दो जरा, रोशनी फैला दो जरा. या रोमॅंटिक पोस्टला नेटिझन्सचे लाईक्स मिळत आहेत.

फरहान अख्तर आणि शिबानीला दीपिका आणि रणवीरच्या मुंबई रिसेप्शनमध्ये एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनीही आपल्या नात्याची ऑफिशिअल कबुली दिली होती. शिबानीने फरहानच्या वाढदिवसावेळी एक फोटो शेअर केला होता. त्याला कॅप्शन होतं की ‘त्याच्याजवळ जगातला सगळ्यात सुंदर टॅटू आहे आणि आजचा दिवस केवळ त्याचा आहे! हॅपी बर्थडे माय स्वीट ग्रम्प्स’ या फोटोमध्ये फरहान शर्ट्लेस आहे तर शिबानीने ब्लॅक बिकिनी घातली आहे. हे लव्हबर्डस लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत अशी चर्चा आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of