रणवीर करतोय रॅप सॉन्गमधून ‘आजादी’चा गजर, असं आहे गली बॉयमधील नवीन गाणं

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंग सध्या गली बॉय बनून रसिकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाचा ट्रेलर, टीजर तसेच आतापर्यंत रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंग सध्या गली बॉय बनून रसिकांचं मन जिंकत आहे. या सिनेमाचा ट्रेलर, टीजर तसेच आतापर्यंत रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

पण आतापर्यंतच्या सगळ्या गाण्यात वरचढ ठरत आहे ‘आझादी’ हे गाणं. या आझादी गाण्यावर रिलीज होताच क्षणी लाईक्सचा वर्षाव झाला आहे. या गाण्यातून आजच्या तरुणाईचा आक्रोश दिसून येत आहे.  समाजातील दोन घटकांमध्ये विभागलेल्या विषमतेवर हे गाणं बोट ठेवतं. गरीबीमुळे अनेकांना आपली स्वप्नं पूर्ण करता येत नाही. देशातील एकुणच परिस्थितीमध्ये भरडत चाललेल्या तरुणाईचा आवाज या गाण्यात रणवीरसिंग बनला आहे. हे गाणं सिद्धांत चतुर्वेदीने गायलं आहे.

आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणा-या आणि झोपडपडपट्टीतील बिकट परिस्थितीमध्ये राहणा-या 26 वर्षीय डिव्हाईन या धारावीतील रॅपर तरुणाच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. या तरुणाची भूमिका रणवीर साकारतोय. रणवीरने इतर सिनेमांप्रमाणेच या सिनेमासाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of