इम्तियाज अली आणणार सैफ आणि साराला एकत्र

सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान एकत्र सिनेमात झळकणार अशा चर्चा बरेच दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरु आहेत

सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान एकत्र सिनेमात झळकणार अशा चर्चा बरेच दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरु आहेत. पण या बापलेकीच्या सिनेमाबद्दल अद्याप तरी कोणतंच सविस्तर वृत्त नव्हतं.

काही दिवसांपूर्वीच नितीन कक्करच्या नातेसंबंधावर आधारित सिनेमात सैफ आणि सारा भूमिका साकारणार होते पण वेळेचं गणित न जमल्याने आता त्या सिनेमात पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला हिची वर्णी लागलीय.

पण तुम्ही अजुनही आशा सोडू नका, ही बाप-लेकीची जोडी इम्तियाज अलीच्या 2009 मधील रोमॅण्टीक सिनेमा ‘लव आजकल’च्या सिक्वलमध्ये झळकणार असल्याचे वृत्त पिपींगमूनच्या हाती आले आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात सारा आपला क्रश कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे बोलले जात आहे. सैफ यात साराच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

लव आजकलच्या सिक्वलमध्येसुध्दा अनेक ट्विस्ट आणि टर्न्स असतील. तर या सिनेमाच्या म्युझिकसाठी प्रितम चक्रवर्ती यांना तर गीतलेखनासाठी इरशाद कामिल यांना अप्रोच करण्यात आलं आहे.

दीपिका पादुकोण, सैफ अली खान आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाने लव आजकल या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या सिनेमातील गाणी आजही प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळतात.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of