काय सांगता…….आता शायनी आहुजाच्या जीवनावर बायोपिक?

वादग्रस्त घटना घडल्यामुळे अभिनेता शायनी अहुजाला सिनेसृष्टीच्या झगमगाटापासून लांब जावं लागलं होतं, आता त्याचा बायोपिक येणार असल्याचं बोललं जात आहे

अभिनेता शायनी अहुजाने बॉलिवूडमध्ये 2003 साली ‘हजारो ख्वायिशें ऐसी’ या सुधीर मिश्रा दिग्दर्शित सिनेमाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर ‘गॅंगस्टर’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘भूल भूलैया’ या सिनेमातून शायनीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण त्यानंतर अचानक त्याच्या सिनेकारकिर्दीला ग्रहण लागावं तशी उतरती कळा लागली. कारणही तसं प्रभावी होतं, 2009 साली त्याच्या घरी काम करणा-या मोलकरणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर त्याला काम मिळेनासंच झालं.

आश्चर्यजनक बाब म्हणजे शायनी आहुजाच्या जीवनावर आता बायोपिक येतोय. एका आघाडीच्या पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार शायनीच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची इच्छा दिग्दर्शक कुमार मंगत यांना आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कुमार यांना ह्या संदर्भात विचारणा झाली. तेव्हा त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. तसंच रिपोर्टनुसार शायनीने आपल्या जीवनावर सिनेमा बनवण्याची कोमतीही परवानगी अद्यापपर्यंत दिलेली नाही.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of