Just Married: बाजीरावची झाली मस्तानी;’दीप-वीर’चा इटलीत कोंकणी पध्दतीने विवाह संपन्न

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका आणि रणवीर आज इटलीतील लेक कोमो येॆतील नयनरम्य अशा व्हिलामध्ये कोंकणी पध्दतीने विवाहबध्द झाले.

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका आणि रणवीर आज इटलीतील लेक कोमो येॆतील नयनरम्य अशा व्हिलामध्ये कोंकणी पध्दतीने विवाहबध्द झाले. दीपिका कोंकणी असल्याने आज 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने विवाहसोहळा संपन्न झाला तर उद्या 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या कुटुंबियांसाठी सिंधी पध्दतीने विवाह पार पडेल.

तुम्हाला माहितच असेल दीप-वीरच्या या शाही विवाहसोहळ्यातील एक झलक पाहण्यासाठी बॉलिवूडकर आणि चाहतेसुध्दा प्रचंड आतुर झाले आहेत. पण लग्नातील एकही फोटो किंवा व्हिडीओ प्रसिध्द होऊ नये म्हणून या लग्नात खास दक्षता घेण्यात आली आहे. पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजत आहे. येथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्ती घालत आहे.

 

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 13 आणि 14 नोव्हेंबर हे दीप-वीरच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवस ठरणार आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of