‘नेटफ्लिक्स’च्या ‘जंगलबुक’मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे नेटफ्लिक्सचे  ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ हे  हिंदी व्हर्जन बॉलिवूड कलाकारांचा आवाजाने सजले आहे.

डिस्नीच्या जंगलबुकमधून भेटीस आलेल्या मोगलीने छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली. या सिनेमाला इरफान खान, शेफारी जरीवाला, नाना पाटेकर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांचा आवाज लाभला होता. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारे नेटफ्लिक्सचे  ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ हे  हिंदी व्हर्जन बॉलिवूड कलाकारांचा आवाजाने सजले आहे.

या मोगली वेबसिरिजमध्ये बॉलिवूडचे राम-लखन म्हणजेच जॅकी श्रॉफ,अनिल कपूर यांच्यासह धकधक गर्ल माधुरी दिक्षीत आणि करिना कपूर खान, अभिषेक बच्चन यांचासुध्दा समावेश आहे.

येत्या 7 डिसेंबरपासून ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. मोगलीतील व्यक्तिरेखांबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक बच्चन बघीराला आवाज देईल, तर जॅकी श्रॉफ शेरखान आहे. अनिल कपूर बालू, करिना कपूर का बनलीाय तर धकधक गर्ल निशा आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of