By  
on  

प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचं निधन, बराच काळ दिली कोव्हिड शी झुंज

लेजंडरी गायक, संगीतकार, अभिनेता एसपी बालासुब्रमण्यम यांच निधन झालं आहे. त्यांना 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर येत होतं. अशात डॉक्टरांनी त्यांच्या हेल्थ अपडेट देऊन त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं या गुरुवारी सांगीतलं होतं. मात्र आज त्यांची आजाराशी झुंज संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला

 एसपी बालासुब्रमण्यम हे चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेयर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनीतर प्रकृती गंभीर असल्याने ते बराच का व्हेंटिलेटरवर होते.  

 एसपी बालासुब्रमण्यम यांचा नाव सगळ्याच जास्त गाणाऱ्या आवाजासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला होता. याशिवाय त्यांना 2001मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

एसपी बालासुब्रह्मण्यम हे 90 च्या दशकात सलमान खानचा आवाज म्हणून प्रचंड प्रसिद्ध होते. त्यांनी सलमान खान च्या सिनेमात  'तुमसे मिलने की तमन्ना है', 'पहला पहला प्यार है', 'दिल दीवाना' और 'साथिया तू ने ये क्या किया' यासारखी अनेक लोकप्रिय गाणी गायली होती. 

 एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने सिनेविश्वात आणि संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive