IFFI2020 : यावर्षी नाहीतर पुढील वर्षी जानेवारीमध्ये पार पडणार 51 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

By  
on  

लॉकडाऊनमुळे जवळपास सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. आता हळूहळू सर्व व्यवहार सुरु होत असले तरी सार्वजनिक संमेलन पुर्वीप्रमाणे होताना दिसत नाहीत. यावर्षी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. 
यावर्षीचा 51 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आता पुढे ढकलला आहे.

 

 

सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करतही याबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबर मध्ये होणारा हा महोत्सव आता पुढे ढकलला गेला आहे. गोव्यातील 51 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आता 16 ते 24 जानेवारीमध्ये होणार आहे. यावेळी डिजीटल पद्धतीनेही महोत्सव साजरा केला जाणार आहे. याशिवाय करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारीही घेतली जाणार आहे.

Recommended

Loading...
Share