या सिनेमातील गाण्यामधील तामिळ उच्चारासाठी आशाताईंना एसपी बालासुब्रमण्यम यांनी केली होती मदत

By  
on  

गायक, संगीतकार एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशाताईंनी एसपी बालासुब्रमण्यम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यंदाचं वर्ष दुर्दैवी असल्याचं म्हटत आशाताईंनी बालासुब्रमण्यम यांची खास आठवण सांगीतली आहे.

आशा भोसले सांगतात की, "यावर्षी बऱ्याच दुर्दैवी घटना घडल्या आहेत. आणि आता एसपी बालासुब्रमण्यम यांच्या निधनाच्या बातमीने तर मी अजून दु:खी झाले आहे. ते एक अद्भुत कलावंत होते. साउथनंतर त्यांचं लक्ष्मीकांत प्यारेलालसोबतचं हिंदीतलं पहिलं गाणं आश्चर्यकारक होतं. त्यांचं लतादीदी यांच्यासोबतचं डुएट संस्मरणीय होते. बालु यांनी आर डी बर्मन आणि त्यांच्या मित्रांसोबत खुप गाणी गायली. त्यांनी मला इलायाराजा सिनेमातील गाण्यासाठी तामिळ उच्चारासाठी मदत केली होती. अशा महान कलाकाराच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.  मी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.   शांततेत विश्रांती घ्या बालु."

यासह अनेक कलावंतांनी या दिग्गज कलाकाराला श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Recommended

Loading...
Share