Bollywood Drug Case: NCB च्या कार्यालयातून निघाल्या सारा अली खान आणि श्रद्धा कपूर, चौकशी झाली पूर्ण  

By  
on  

अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. बॉलिवुडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा तपास आता गती घेताना दिसतोय. 

शुक्रवारी एनसीबीने रकुल प्रीत सिंहची चौकशी केली होती. रकुल हैदराबादमध्ये होती. एनसीबीकडून समन मिळाल्यानंतर ती मुंबईत आली होती.


चौकशीत रकुलने रियासोबत केलेलं ड्रग्स चॅट कबुल केला मात्र ड्रग्स घेण्याचे आरोप फेटाळले. रकुल प्रीतने एनसीबीला सांगीतलं की रिया त्या चॅटमध्ये तिचं सामान (ड्रग्स..वीड) मागवत होती. रियाचे ते सामान रकुलच्या घरी होतं.


 

Recommended

Loading...
Share