या लॉकडाऊनमध्ये शाहरुख खानही बनला शेफ, गौरी खानने केला खुलासा

By  
on  

या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी स्वयंपाकघरात हात आजमावला. अभिनेता शाहरुख खान याला अपवाद नाही. लॉकडाऊनमध्ये शाहरुखही गौरी आणि मुलांसाठी शेफ बनला. गौरीने एका मुलाखतीमध्ये ही बाब स्पष्ट केली. लॉकडाऊन दरम्यान शाहरुखचं सर्व कुटुंब ‘मन्नत’ मध्ये राहात होतं . शाहरुखला विविध पदार्थ बनवायला आवडतात तर गौरीला ते खायला.

 

गौरी म्हणते, या लॉकडाऊनमध्ये बाहेरून अन्न मागवणं हे सुरक्षित वाटत नव्हतं. मग शाहरुखने घरीच रुचकर पदार्थ बनवले. आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले.’ मुलांबाबत ती म्हणते, ‘आर्यन ने साउथ कैलिफोर्निया यूनिवर्सिटी मधील फिल्म मेकिंग कोर्स पुर्ण केला आहे. याशिवाय घरी एक टन सिनेमे पाहत आहे. तर न्यूयॉर्क यूनिवर्सिटी मध्ये सुहानाचे ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत.’ शाहरुख शेवटचा 2018मध्ये ‘झिरो’ सिनेमात दिसला होता.

Recommended

Loading...
Share