करण जोहरचं नाव ड्रग्स प्रकरणात गोवण्यासाठी क्षितीज प्रसादवर एनसीबीने दबाव टाकला?

By  
on  

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरी २०१९ मध्ये झालेल्या पार्टीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. करणच्या घरी ड्रग्ज पार्टी झाल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत असून त्या व्हिडीओची चौकशी एनसीबी करणार असल्याचं बोललं जात होतं. 

दरम्यान, धर्मा प्रोडक्शनचा माजी  कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसाद याला एनसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी एनसीबीने क्षितीजची जवळपास २४ तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 

क्षितीजने नुकतंच कोर्टात आपली साक्ष देताना, एनसीबीने माझ्यावर धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहरचं नाव ड्र्ग्ज प्रकरणात गुंतवण्यासाठी दबाव टाकल्याचं म्हटलं आहे. 

क्षितीज हा नोंव्हेंबर 2019 दरम्यान धर्मा प्रोडक्शनमध्ये कार्यरत होता. तसंच आता एनसीबीने क्षितीजच्या घरी टाकलेल्या धाडीत त्यांना गांजा वगैरा असे पुरावेसुध्दा सापडले आहेत. 

 क्षितीजवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. यासोबतच क्षितीजच्या घरी होणाऱ्या प्रत्येक पार्टी किंवा कार्यक्रमामध्ये ड्रग पेडलर अंकुश सहभागी असायचा हेदेखील समोर आलं आहे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. 
 

Recommended

Loading...
Share