गानसम्राज्ञी लतादीदींच्या वाढदिवसाला बहिण आशाताईंनी शेयर केली लहानपणीची ही खास आठवण

By  
on  

आज भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. त्या चाहत्यांसह सिनेविश्वातील अनेक कलाकारांना त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनीदेखील आपल्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आशा ताईंनी सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्य म्हणजे या पोस्टमध्ये आशाताईंनी त्यांचा लतादीदींसोबतचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत लतादीदींसोबत आशाताई आणि मीनाताईदेखील आहेत. या मंगेशकर बहिणींचा लहानपणीचा सुंदर फोटो सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

 

या पोस्टमध्ये आशा भोसले लिहीतात की, "लता दीदींना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन ज्या आज 91 वर्षांच्या झाल्या. या फोटोद्वारे आपल्या बालपणीचे दिवस आठवत आहे. जिथे दिदी डाव्या बाजुला आणि मीना ताई आणि मी तिच्या मागे उभ्या आहोत."

Recommended

Loading...
Share