By  
on  

पाकिस्तान सरकारला आली जाग, खरेदी करणार दिलीप कुमार आणि राज कपूर यांची वडिलोपार्जित घरं

पाकिस्तान सरकारने आता दिलीप कुमार आणि राज कपूर यांची वडिलोपार्जित घरं विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. खैबर-पख्तूनख्वा या प्रांतातील सरकारने या इमारती जतन करण्याचं ठरवलं आहे. या दोन्ही इमारती पेशावरमध्ये आहेत. 
पुरातत्त्व विभागाचे प्रमुख, डॉ अब्दुस समद खान यांनी अधिक माहिती दिली आहे.

 

ते याबाबत म्हणतात, ‘ राज कपूर यांच्या हवेलीला कपूर हवेली या नावाने ओळखलं जातं. राज कपूर यांचे आजोबा बशेश्वरनाथ कपूर यांनी हे घर 1918 ते 1922 दरम्यान बनवलं आहे. याशिवाय दिलीप कुमार यांचं घरही 100 वर्षं जुनं आहे. या पुर्वी या हवेलीच्या जागी अनेक कमर्शिअल कॉम्प्लेक्स बनवण्याचा प्रयत्नही झाला. 2018 ला ही हवेली म्युझिअम बनवण्याची मागणी ऋषी कपूर यांनी केली होती. पण ती पुर्ण होऊ शकली नव्हती.

Recommended

PeepingMoon Exclusive