एक्टर आणि मॉडल मिलिंद सोमन हा 54 वर्षांचा आहे. त्याच्या फिटनेसवरून त्यांच्या वयाचा पत्ता लागत नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिलिंद हा त्याच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा देतो. त्याचा फिटनेस फंड अनेक जण फॉलो करतात. नुकतच मिलिंदने त्याच्या जुन्या आठवणींविषयी सांगताना तो सिगरेट पित असल्याविषयीची गोष्ट सांगीतली आहे.
मिलिंदने ट्विट केले की, “मी सिगरेट पित होतो कारण मी मूर्ख होतो. सगळ्या स्मोकर्सना ही गोष्ट लागू होते ?
I used to smoke because I was stupid. Is it the same for all smokers ?
— Milind Usha Soman (@milindrunning) September 28, 2020
यावर मिलिंदच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युझरने लिहीलं की, “आता तुम्ही फिट आहात कारण तुम्ही समजदार आहात ही गोष्ट सगळ्यांना लागू होते.?” य़ावर उत्तर देताना मिलिंद म्हटला की “मी नेहमी फिट होतो मात्र नेहमी समजदार नव्हतो.”
मिलिंद सोशल मिडीयावर बऱ्याचदा पत्नि अंकितासोबतचे फोटो पोस्ट करताना दिसतो. तर कधी त्याच्या रनिंग, वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.