By  
on  

दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची FTII चे नवे अध्यक्षपदी निवड

हिंदी सिनेमातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक शेखर कपूर यांना फिल्म एंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे अध्यक्ष आणि FTII गवर्निग काउंसिलच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे.याबाबतची घोषणा केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry Of Information And Broadcasting) केली आहे. शेखर कपूर यांनी बीपी सिंह यांची जागा घेतली आहे. 
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोशल मिडीयावर शेखर कपूर यांच्या अध्यक्ष पदाविषयीची माहिती देताना सांगीतलं की 3 मार्च 2023 पर्यत शेखर हे या पदावर असतील. ते लिहीतात की, “मिस्टर कपूर, ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे. संस्थानात अधिक मुल्य जोडतील. मला विश्वास आहे की प्रत्येक जण या नियुक्तीचं स्वागत करेल.”

सिनेसृष्टीत शेखर कपूर यांची एक संवेदनीश, कलात्मक दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. शेखर कपूर यांनी त्यांच्या करियरची सुरुवात ‘मासूम’ सिनेमाने केली होती. ‘मिस्टर इंडिया’ या गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. ‘बँडिट क्वीन’ हा फूलन देवीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा त्यांनी केला होता. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. शेखर कपूर यांनी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या दिग्दर्शनाची कमाल दाखवली आहे. ‘द फोअर फिदर्स’, ‘एलिझाबेथ द गोल्डन एज’, ‘न्यूयॉर्क आय लव्ह यू’ आणि ‘पॅसेज’ यांसारखे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.शेखर कपूर यांनी टीव्ही मालिकेसाठीही दिग्दर्शन केले असून त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘खानदान’ ही मालिका चांगलीच गाजली होती.  दिग्दर्शक, निर्मात्यासह त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केलं आहे. 
शेखर कपूर यांना 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेयर पुरस्कारांसह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive