By  
on  

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी घेतला अवयव दानाचा निर्णय, पण....

अमिताभ यांनी आपल्या ग्रीनसुटवर रिबीन लावलेला एक फोटो शेअर केला आहे. ही रिबीन साधीसुधी नाही. ही रिबीन अवयव दानाशी संबंधित आहे. अमिताभ यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला आहे. रिबीन लावलेला फोटो शेअर करताना बिग बी म्हणतात, ‘ मी एक शपथ घेतलेला ऑर्गन डोनर आहे. मी हे ग्रीन रिबीन त्याच्या पवित्रतेसाठी घातलं आहे.

 

 

अमिताभ यांच्या ट्वीटनंतर नेटिझन्सनीही उत्साहाने ऑर्गन डोनेशनचं त्यांचं सर्टिफिकेट शेअर केलं. यावेळी एका युजर मात्र वेगळी कमेंट केली आहे. तो म्हणतो, ‘ सर तुम्हाला हेपेटाईटिस-बी आहे. तुमचे ऑर्गन इतर कुणाला देता येत नाहीत. 
याशिवाय तुम्ही स्वत:चं लिव्हर ट्रांसप्लांट केलं आहे आणि इम्युनोसप्रेसेंट औषधं घेत आहात. मी तुमच्या निर्णयाचं कौतुक करतो. पण हे बोलण्यापुर्वी क्षमा मागतो की, तुम्ही वैज्ञानिक दृष्टीने ऑर्गन डोनर नाही बनू शकत.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive