दीर अनिल देवगणच्या निधनानंतर काजोलने शेअर केली ही पोस्ट

By  
on  

अलीकडेच अजय देवगणचा भाऊ अनिल देवगण याचं निधन झालं. अनिल अजयचा चुलत भाऊ होता. दीराच्या निधनानंतर काजोलनेही एक पोस्ट शेअर करत भावनांना वाट करून दिली आहे. काजोलने एक मोकळ्या मांडवाचा फोटो शेअर केला आहे. या मांडवात दुर्गादेवी दिसते आहे.

 

आपल्या पोस्टमध्ये काजोल म्हणते, ‘ यावर्षी कोणतीही पुजो नाही. पण मला माहिती आहे आई मला वर्षभर पाहात असते. या वेळी मला सर्वात जास्त तुमची गरज आहे.’ यावेळी अजय आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, ‘काल माझा भाऊ अनिल देवगण याचं निधन झालं. त्याच्या आकस्मिक जाण्याने आम्हाला धक्का बसला आहे. ADFF आणि मला त्याची सतत आठवण येईल. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. करोनाच्या साथीमुळे कोणतीही प्रेअर मीट केली जाणार नाही.’ अनिलने ‘राजूचाचा’,’ब्लॅकमेल’, ‘हाल-ए-दिल’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

Recommended

Loading...
Share