आमीर खानची लेक इरा म्हणते, ‘होय ! मी गेली चार वर्षं डिप्रेशनमध्ये आहे’

By  
on  

काल ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य’ दिवस साजरा केला गेला. यावेळी आमीर खानची लेक इराने व्हिडियो शेअर करत तिच्या डिप्रेशनची स्टोरी शेअर केली आहे. आपल्या व्हिडियोमध्ये इरा म्हणते, ‘हाय मी डिप्रेस आहे. गेली चार वर्षं मी डिप्रेशनमध्ये आहे. मी डॉक्टरांकडेही गेले होते. 

 

 

मी वैद्यकिय दृष्ट्या डिप्रेस असले तरी आता उत्तम फिल करते आहे. मी गेली एक वर्षं मेंटल हेल्थशी संबंधित काहीतरी करू इच्छित होते. त्यामुळेच मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं आहे. खुप लोकांजवळ सांगण्यासारखं काही आहे. 
हे सगळं कसं सांगावं याला काही प्रमाण नाही. पण मला काहीतरी सापडल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे या यात्रेत माझ्यासोबत या. माझ्या बालिश, विचित्र भाषेसोबत. पण प्रामाणिकपणे या प्रवासाची सुरुवात करुया.’

Recommended

Loading...
Share