DDLJ च्या सिल्वर जुबलीच्या निमित्ताने लंडनमध्ये पार पडणार ही खास गोष्ट

By  
on  

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा भारतीय सिनेमातील आयकॉनिक सिनेमांपैकी एक आहे. 20 ऑक्टोबर रोजी या सिनेमाला तब्बल 25 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीत या सिनेमाने रोमँटिंक सिनेमांमध्ये एक बेंचमार्क सेट केला आहे. आदित्य चोप्राच्या या सिनेमातील शाहरुख - काजोलच्या राज - सिम्रनच्या जोडीने अक्षरक्षह वेड लावलं होतं. आजही या सिनेमाची जादू कायम आहे. यशराज फिल्मच्या या मेगा ब्लॉकबस्टर सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडीस काढले. आणि याच सिनेमाच्या सिल्व्हर ज्युबली निमित्ताने राज - सिम्रनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने या सिनेमातील राज-सिम्रन म्हणजेच शाहरुख-काजोलच्या कांस्य पुतळ्याचे लंडनमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी लंडनमध्ये खास सोहळा पार पडणार आहे. लंडनच्या लीसेस्टर स्कायरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. शाहरुख-काजोलचे हे पुतळे सिन्स इन द स्काअर फिल्म ट्रेलमध्ये दाखल होतील जिथे मैरी पॉपिंग, मिस्टर बीन, पैडिंग्टन, सुपरहीरो बैटमैन, वंडर वुमन, बग्स बनी, सिंगिंग इन द रेन मधील जीन केली यांचे पुतळे आहेत.

हार्ट ऑफ लंडन बिझनेस एलायंसने रविवारी सांगीतलं की "लीसेस्टर स्कायर मध्ये लावलेल्या काही सिनेमांच्या पुतळ्यांसोबत म्हणजेच सीन्स इन द स्कायर मध्ये आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चा देखील सीन ठेवण्यात येईल." लंडनमध्ये होणारा हा सोहळा पुढील वर्षाच्या सुरुवातीला पार पडणार आहे. मुख्य म्हणजे स्वत: शाहरुख आणि काजोल देखील यात सहभागी होणार असल्याचं बोललं जातय. 

हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील एक असा ब्लॉकबस्टर सिनेमा आहे जो सिनेमागृहात सगळ्यात जास्त काळासाठी चालला आहे. 

Recommended

Loading...
Share