हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिप्ती नवल यांची झाली एंन्जियोप्लास्टी, प्रकृती स्थिर

By  
on  

 जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री दीप्ती नवल  यांना रविवारी मनाली-हिमाचल प्रदेश येथे  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना एम्ब्युलन्सने  मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर त्वरित  एंजियोप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत आता  सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

 

दिप्ती नवल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘जुनून’, ‘चश्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’ सारख्या अनेक चित्रपटात त्यांचा अभिनय गाजला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्या उत्कृष्ठ चित्रकार आणि कवियत्रीदेखील आहेत. पंजाबमध्ये जन्मलेल्या दीप्ती नवल यांचे बालपण अमेरिकेत गेले.

 

Recommended

Loading...
Share