By  
on  

ह्या अभिनेत्रीवर झाला प्राणघातक हल्ला ,जाणून घ्या

टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मालवीच्या एका मित्रानेच तिच्यावर हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

हल्ल्यात मालवीच्या शरीरावर चाकूने तीन वार करण्यात आले आहेत. याप्रकरणानंतर मालवीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार घेत आहे. एका मित्रानेच तिच्यावर हल्ला केल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. योगेश कुमार इअसं तिच्या मित्राचं नाव असून तो निर्माता आहे. फेसबुकच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 

 

 

दरम्यान, मालवीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  अलिकडेच तिची उडान ही मालिका विशेष गाजली होती.

 

 

मालवी ही मूळची हिमाचल प्रदेशची रहिवासी आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive