By  
on  

पाहा Video : दसऱ्याला जॅकलीन फर्नांडिसने स्टाफ मेंबरला गिफ्ट केली नवीकोरी कार 

जॅकलीन फर्नांडिस ही नेहमीच तिच्या विविध भूमिका, डान्समुळे लक्षवेधी ठरते. एक अभिनेत्रीसोबत ती एक चांगली व्यक्ती असल्याचंही अनेकदा समोर आलेलं आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जॅकलीनने तिच्या एका स्टाफ मेंबरला चक्क नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर जॅकलीनने तिच्या स्टाफ मेंबरला गाडी गिफ्ट करून सरप्राईज केलेलं आहे. जॅकलीनचे हा स्टाफ मेंबर तिच्यासोबत तेव्हापासून आहे जेव्हा जॅकलीनने सिनेमांमध्ये डेब्यू केला होता. 

जॅकलीनने कार तर गिफ्ट केली मात्र तिला हे माहिती नव्हतं की ती केव्हा डिलीवर होईल. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जॅकलीन ट्राफिक पोलिसाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतेय. म्हणजेच जॅकलीन तिच्या शुटिंगमध्ये व्यस्त असताना तिने ही कार तिच्या स्टाफला दिली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही जॅकलीनने तिच्या मेकअप आर्टिस्टला कार गिफ्ट केली होती.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओत जॅकलीन हातात मिठाई आणि पूजेचं ताट घेऊन उभी दिसतेय. जेव्हा तिने स्टाफला कार गिफ्ट केली तेव्हा नारळ फोडून नव्या गाडीचं स्वागत करण्यात आलं.

Recommended

PeepingMoon Exclusive