न्यूड फोटोशूटप्रकरणी मिलिंद सोमण विरोधात गोव्यात तक्रार दाखल

By  
on  

गोव्याच्या समुद्र किना-यावर अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री - मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बेला अटक करण्यात आली होती. ही घटना सध्या चर्चेत असतानाच गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोव्याच्या वास्को येथील पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाढदिवसाच्यानिमित्ताने मिलींदने सोशल मिडीयावर आपला न्यूड धावतानाचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला होता. 

 

 

प्रसिध्द अभिनेता आणि मॉडेल मिलींद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मिडीयावर नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.  वाढदिवसाच्या दिवशी त्याने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला . यात तो बीचवर धावताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे  न्यूड फोटो शेअर करण्याची मिलींदची ही पहिलीच वेळ नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

Recommended

Loading...
Share