By  
on  

OTT वर नाही तर थिएटरमध्ये रिलीज होणार सलमानचा 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई'

सलमानच्या आगामी 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज होणार अशी चर्चा होती. पण निर्मात्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा सिनेमा थिएटरमध्येच रिलीज होणार असल्याचं समोर आलं आहे.

 

हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' या आगामी सिनेमात भाईजान अंडरवर्ल्डच्या डॉनची भूमिका साकारतोय. तर प्रभूदेवाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात सलमानसह दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive