By  
on  

अनलॉकमध्ये थिएटरवर ‘तुझे मेरी कसम’ ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला रितेश देशमुख

रितेश- जेनिलिया जोडीचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सिनेमाची टीनएज लव्हस्टोरी, रितेश जेनिलियाची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. 2003 मध्ये आलेल्या या सिनेमाचं आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड आहे. अनलॉकमध्ये ब-याच दिवसांनीथिएटर सुरु झाले आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींनी थिएटरकडे धाव घेतली आहे.

 

 

इंचलकरंजीमधील एका थिएटरमध्ये तुझे मेरी कसम हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाला आहे.  ही बाब रितेशच्या लक्षात येताच त्याने ट्वीट करत आभार मानले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये रितेश म्हणतो, ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आमच्या पदार्पणातील सिनेमावर इतकं सातत्याने प्रेम करत राहण्यासाठी तुमचे खुप आभार.’ रितेश आगामी दुर्गावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive