By  
on  

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

NCBने शनिवारी ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घर आणि ऑफिसवर छापा मारला. दोन्ही ठिकाणाहून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. भारती आणि हर्षला आज कोर्टात हजर केलं आहे. या दोघांनाही 14 दिवसांच्या म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

 

या दोघांच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. हर्ष आणि भारतीला 'एनडीपीएस अधिनियम 1986’ नुसार अटक केली आहे. त्यावेळी या दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive