By  
on  

अभिनेता अमित साधचा धक्कादायक खुलासा, चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता अमित साध हा हिंदी टेलिव्हिजन आणि जाहिरांतीमधला प्रसिध्द चेहरा. ‘ब्रीद : इन्टू द शॅडो’ या वेब सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी अमितचं प्रचंड कौतुक झालं. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अमितने त्याच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने आपल्या मानसिक स्वास्थ्याविषयी मनोगत व्यक्त केलं. तणावात असताना अमितने तब्बल चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं. 

अमित सांगतो, "जेव्हा मी  16-17 वर्षांचा होतो तेव्हा मी स्वत: चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार नव्हता, काही प्लॅनिंग नव्हती. अचानकच माझी जगण्याची इच्छा निघून जायची. जेव्हा चौथ्यादा प्रयत्न केला, तेव्हा खरंच मनातून वाटलं की आपण असं जगू शकत नाही. मग मी ठरवलं अशा जगण्याला अर्थ नाही. आपण आपली मानसिकता बदलायला हवी. हे नकारात्मक विचार काढून टाकायला हवेत. आता फक्त पुढे चालत राहायचं, प्रयत्न सोडायचे नाहीत. असं मनाशी पक्क ठरवलं. त्यानंतर मग नेव्हर गिव अप हा मंत्र अवलंबत मी पुढे जात राहिलो. कधीच मागे वळून पाहिलं नाही"

‘काय पो चे’, ‘गुड्डू रंगीला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमित साधने स्वत:चं स्थान इंडस्ट्रीत निर्माण केलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive