By  
on  

भारती आणि हर्ष लिंबाचियाला मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर

ड्रग प्रकरणात न्यायालीन कोठडीत असलेल्या कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीला मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.  15 हजारांच्या जातमुचल्यक्यावर दोघांना जामिन मिळाला आहे.  NCBने शनिवारी ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घर आणि ऑफिसवर छापा मारला.

 

दोन्ही ठिकाणाहून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांचीही वेगवेगळी चौकशी केली गेली. साडे तीन तास झालेल्या चौकशीनंतर भारतीला NCB ने अटक केली. भारतीला भायखळा जेलमध्ये ठेवलं होतं तर हर्षला तळोजा जेलमध्ये ठेवलं होतं.  चौकशी दरम्यान या दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं होतं. पती हर्ष गांजाची खरेदी करत असल्याचंही तिने यावेळी कबूल केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive