By  
on  

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील फिजिओथेरपिस्टसोबत प्रभूदेवाने उरकलं लग्न, वाचा सविस्तर

दिग्दर्शक, कोरिओग्राफर प्रभूदेवा सध्या लग्नाच्या चर्चेमुळे प्रकाशात आहे. प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करू शकतो असं बोललं जात होतं. पण नुकत्याच समोर आलेल्या बातमीने या चर्चांवर पडदा पडला आहे. प्रभुदेवाच्या मोठ्या भावाने त्याच्या लग्नाची बातमी समोर आणली आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईतील फिजिओथेरपिस्ट हिमानीसोबत प्रभूदेवाने लग्न उरकलं असल्याचं त्याच्या भावाने स्पष्ट केलं आहे. 

पाठ आणि पायाच्या इलाजादरम्यान प्रभूदेवाची हिमानीसोबत ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या मार्चमध्ये दोघांचं लग्न पार पडलं. या लग्नाला अगदी मोजकेच लोक उपस्थित होते.  प्रभूदेवाचं नयनतारासोबत अफेअर असल्याचं बोललं जात होतं. 2011 मध्ये त्याने पहिली पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive