भूमि पेडनेकरच्या 'दुर्गामती'चा टीजर प्रदर्शित, टीजरमध्ये भूमिचा इंटेन्स लुक

By  
on  

अभिनेत्री भूमि पेडनेकरच्या 'दुर्गामती' या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमारने या सिनेमाचा टीजर प्रदर्शित केला आहे. नुकतच अक्षय कुमारने या सिनेमाचा नवा पोस्टर आणि बदललेलं नाव शेयर केलं होतं. हॉरर फिल्म दुर्गावतीचं नाव बदलुन आता 'दुर्गामती : द मिथ' असं ठेवण्यात आलय. हा सिनेमा येत्या 11 डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय या सिनेमाचा को-प्रोड्युसर आहे.

नुकत्याच प्रदर्शित केलेल्या टीजरमध्ये भूमिचा हटके अवतार पाहायला मिळतोय. भूमिच्या इंटेन्स लुकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.  टीजर शेयर करून अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, "आता परत करण्याची वेळ आहे, 11 डिसेंबरला प्राईमवर दुर्गामतीला भेटा. ट्रेलर उद्या रिलीज होईल."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

हा सिनेमा साउथ फिल्म भागमती चा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी नंतरचा हा दुसरा सिनेमा आहे, ज्याचं अगदी शेवटी नाव बदलण्यात आलय. हा सिनेमा अमेजॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

 भूमि ही नेहमीच तिच्या हटके भूमिकांमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधते. या सिनेमात भूमिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share