तमिळ अभिनेत्याचं निधन ,आयुष्याचे शेवटचे दिवस होते हलाखीचे

By  
on  

तामिळ अभिनेते आणि कॉमेडियन थवासी यांनी सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी चाहत्यांकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली होती.

मदुराई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल अखेर त्यांची ही जीवन मरणाची झुंज संपली. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विशिष्ट अशा पिळदार शरिरयष्टीसाठी ते प्रसिध्द होते. त्यांनी जवळपास  हून अधिक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. 

Recommended

Loading...
Share