By  
on  

‘दिल्ली क्राईम’ ची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल, मिळाला एमी पुरस्काराचा मान

 यंदाच्या एमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिरीजचा डंका वाजतो आहे. एमी पुरस्कार सोहळ्यात  ‘दिल्ली क्राईम’ या वेब सीरिजनं सर्वोत्कृष्ट ड्रामा या विभागात पुरस्कार पटकावला आहे. करोनामुळे गेल्या 48 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एमी पुरस्कार व्हर्च्युअली सादर केले गेले. एमी पुरस्कार मिळवणारी ‘दिल्ली क्राईम’ ही पहिली वेबसिरीज बनली आहे.

 

 

या सिरीजमध्ये शेफाली शाह, राजेश तैलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज  हे कलाकार दिसून आले होते. रिची मेहता यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं होतं.  नेटफ्लिक्सवरील या सिरीजमध्ये वर्तिका चतुर्वेदी मुख्य भूमिकेत होती.

Recommended

PeepingMoon Exclusive