जान्हवी कपूरने साईन केला मल्याळम सिनेमा 'हेलेन'चा रिमेक, वडिलांच्या भूमिकेत मनोज पाहवा ?

By  
on  

 श्रीदेवी आणि फिल्ममेकर बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर ने 2018मध्ये धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. जान्हवीने कमी कालावधीतच तिच्या करियरमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. जान्हवीचा दुसरा सिनेमा 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' नंतर तर जान्हवी ने हे सांगितलं होतं की तिला अजून कामं करायची आहेत. आणि आता आणखी एका सिनेमासाठी जान्हवी सज्ज होत आहे. मल्याळम सिनेमा 'हेलेन'च्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जान्हवीने नुकताच हा सिनेमा साईन केला आहे. 'हेलेन' ही एका तरुण नर्सची कथा आहे जिला कॅनडात वास्तव्य करायचं आहे. मात्र काही अशा गोष्टी घडतात जेव्हा ती कामावरून घरी परत येतच नाही आणि गायब होऊन जाते.

 याच हिंदी रिमेकमध्ये प्रसिद्ध अभिनेता मनोज पाहवा यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. मनोज हे जान्हवीच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज पाहवा हे या सिनेमाची स्क्रिप्ट ऐैकून प्रचंड उत्साहित होते आणि त्यांनी लगेचच या सिनेमासाठी होकार दिल्याचं बोललं जातय. बोनी कपूर आणि मनोज पाहवा यांच्यात चांगली मैत्री आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार जान्हवी कपूर हेलेनच्या रिमेकचं जास्तीत जास्त शूटिंग हे लखनऊमध्ये करणार आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि इतर शहरांमध्येही या सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे. येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सिनेमाची इतर तयारी आता सुरु करण्यात आली आहे. या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओ आणि बोनी कपूर करणार आहेत. तर माथुकुट्टी जेवियर या सिनेमाचं दिग्दर्शन करतील जे ओरिजिनल सिनेमा 'हेलेन'चे दिग्दर्शक आहेत.

Recommended

Loading...
Share