आमिर खानच्या फिटनेस कोचवर जडलाय लेक इराचा जीव, जाणून घ्या

By  
on  

बॉलिवूडचा  मिस्टर परफेक्शिस्ट आमिर खानची लेक इरा खान नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. कधी डिप्रेशन तर कधी आई-वडीलांचं नातं या गोष्टींमुळे ती सतत प्ररकाशझोतात असते. पण आता इरा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिचीच रिलेशनशीप. 

असं म्हटलं जातंय की, इराचा वडील आमिर खान यांचा फिटनेस कोच नुपूर शिखारेवर जीव जडलाय आणि दोघंही एकमेकांना डेट करतायत. अनेकदा सोशल मिडीयावर नुपूरसोबतचे फोटो आणि एकमेकांच्या पोस्टला कमेंट्स करण्यावरुन या जोडीने त्यांच्या नात्याविषयी नेटक-यांना हिंट दिली आहे. मागच्या वर्षी इराचं नाव मिशाल कृपलानी या व्यक्तिसोबत जोडलं गेलं होतं. पण हे नात फार काळ टिकलं नाही आणि दोघांचं ब्रेकअप झालं. 

मिडीया रिपोर्टसनुसार, लॉकडाऊन दरम्यान इरा आणि नुपूर दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. खास करुन इराने आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याचें ठरवले तेव्हा त्यांच्यातली जवळीक वाढली. तसंच दोघांनी महाबळेश्वरला खान फार्महाऊसवर व्हेकेशन एन्जॉयसुध्दा केलं. असंसुध्दा म्हणतायत दोघंही आपल्या नात्याविषयी प्रचंड सिरीयस आहेत. पण नुपूर आणि इरा खानच्या या रिलेशनशिपविषयी अद्यापतरी आमिरची पहिली पत्नी रिना खानकडून कोणतंच अधिकृत वृत्त नाही. 

Recommended

Loading...
Share