दुर्गामतीच्या हवेलीत दडलंय कोणतं रहस्य? पाहा ‘दुर्गामती’ चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

By  
on  

भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला ‘दुर्गामती’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार या सिनेमाचा सह निर्माता आहे. पुर्वी या सिनेमाचं नाव दुर्गावती होतं. पण आता हे नाव बदलून ‘दुर्गामती: द मिथ’ असं केलं आहे.  

 

 

भूमी यात चंचल चौहान ही व्यक्तिरेखा साकारते आहे. चंचलला एका केसच्या निमित्ताने दुर्गामती हवेलीत चौकशीसाठी नेलं जातं. पण तिथे तिला सामना करावा लागतो दुर्गामतीचा. या ट्रेलरमध्ये अनेकदा थरकाप उडवणारे सीन आहेत. हा सिनेमा तेलुगु-तमिळ सिनेमा ‘भागमती’ चा रिमेक आहे. या सिनेमात अनुष्का शेट्टी लीड रोलमध्ये होती.  पण या सगळ्याला वरचढ ठरतो तो भूमी चा अभिनय. भूमीने या सिनेमात जीव ओतल्याच ट्रेलरवरून दिसत आहे. हा सिनेमा 11 डिसेंबरवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे.

Recommended

Loading...
Share