हैद्राबादमध्ये अजय देवगणने सुरु केली ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ च्या शुटिंगला सुरुवात

By  
on  

करोनामुळे अजय देवगणचा सिनेमा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’चं शुटिंग थांबलं होतं. 8 महिन्यानंतर अजयने रामोजी फिल्मसिटीमध्ये शुटिंगला सुरुवात केली आहे. हैद्राबादमध्ये सिनेमाचं 10 दिवसांचं शेड्युल आहे. सेटवर सगळ्यांना करोनाविरोधात योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 

सिनेमाच्या 10 दिवसांच्या शेड्युलसाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये एक सेट बनवला गेला आहे. यानंतर 11 डिसेंबरपासून अजय आगामी ‘मे डे’ सिनेमावर काम सुरु करेल. या सिनेमात अजय अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. मे डेनंतर अजय मैदानच्या शुटिंगला सुरुवात करेल.

Recommended

Loading...
Share