हैद्राबादमध्ये कंगनाने घेतली संजय दत्तची भेट, जाणून घ्या

By  
on  

काही कामानिमित्त सध्या संजय दत्त आणि  कंगना राणौत है दोघं हैद्राबाद येथे आहेत. खरंतर कंगना हैद्राबाद येथे आपला आगामी सिनेमा थलाईवीचं शेवटचं  शूटींग शेड्यूल पूर्ण करतेय. याचदरम्यान कंगनाने अभिनेता संजय दत्तची भेट घेतली आणि या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. तसंच याशिवाय कंगनाने या भेटीचा अनुभव आणि संजयच्या तब्येतीबद्दल सांगितलं. 

कंगना आपल्या पोस्टमध्ये लिहते," जेव्हा मला कळलं की आम्ही दोघं एकाच हॉटेलमध्ये थांबलो आहेत, तेव्हा मी लगेचच संजय सरांना भेटायला गेली. त्यांना पाहताच क्षणी मी अवाक् झाले. कारण ते पहिल्यापेक्षासुध्दा आणखी हॅण्डसम आणि सुपरफीट दिसत होते. मी त्याच्या स्वास्थ्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदैव देवाकडे  प्रार्थना करतेय." 

 

 

 

 

 

 

 काही महिन्यांपूर्वी  संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे  निदान झाले. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे सर्वांना आपल्या कॅन्सरची  माहिती दिली.

आता संजय दत्तने कॅन्सरवर मात केली असून त्याने आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे.

Recommended

Loading...
Share