कियारा आडवाणीच्या ‘इंदू की जवानी’मधील या डायलॉग्जना सेंसॉरची कात्री

By  
on  

कियारा आडवाणीच्या ‘इंदू की जवानी’ सिनेमातील काही डायलॉग्जवर सेन्सॉरने बदल केला आहे. कियारा एके ठिकाणी आदित्य सीलला 'हरामजादे' म्हणते तिथे आतंकवादी' मध्ये बदल झाला आहे.  तर दिल्लीतील महिलांवरील अत्याचारावर बेतलेल्या डायलॉगला संपुर्णपणे वगळलं आहे.

 

 

या सिनेमात कियारा उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुलीची भूमिका साकारत आहे. ही मुलगी डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून प्रियकराच्या शोधात असते. हा सिनेमा 11 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा सिनेमा 5 जून 2020 ला रिलीज होणार होता. पण करोनामुळे याच्या रिलीज डेटमध्ये बदल झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अबीर सेनगुप्ताने केलं आहे.

Recommended

Loading...
Share