अजय देवगण जानेवारीमध्ये करणार ‘मैदान’ च्या शुटिंगला सुरुवात

By  
on  

सुपरस्टार अजय देवगणचा आगामी सिनेमा मैदान पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज होतो आहे. झी स्टुडियो आणि बोनी कपूर यांच्या संयुक्त विद्यामानाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'मैदान' सिनेमाचं दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करतायत.  भारताचे दिग्गज फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

 

फुटबॉलपटू खेळाडूंचा झंझावात या सिनेमात अनुभवता येणार आहे. या सिनेमाचं शुटिंग जानेवारीच्या तिस-या आठवड्यात पुन्हा सुरु होत आहे. लॉकडाऊन दरम्यान खराब झालेल्या या सिनेमाचा सेट पुन्हा बनवला जाणार आहे. 16 एकर जमीनीवर हा सेट पुन्हा बनवला जाणार आहे. भारताचे दिग्गज फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे.

Recommended

Loading...
Share